संयुक्त महाराष्ट्राचा लढा, १०५ हुतात्म्यांचे बलिदान हे सर्व काही आमच्या पिढीने पाहिले नाही. पु. लं. नंतर त्या तोडीचा मराठी साहित्यिक देखील आमच्या पिढीत निर्माण झाला नाही. तशी आमची पिढी 'पोस्ट ग्लोबलायझेशन इरा' मध्ये वाढलेली. मी तर मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो, वाढलो. म्हणजे लायसन्स राज, आणिबाणी, बेरोजगारी या सर्व गोष्टींचे चटके आधीच्या पिढ्यांइतके आम्हाला सोसावे देखील लागले नाहीत. तसे आम्ही राजकारणापासून आलिप्तच! पण तरीही 'बाळासाहेब ठाकरेंचं' नी आमचं नातं राहिलं. हे नातं काही प्रमाणात धाकाचं होतं, काही प्रमाणात आदराचं देखील होतं पण इतर कशाहीपेक्षा मराठी माणसाच्या न्याय हकासाठी लढणार्या आमच्या नेत्याबद्दल प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आणि कृतज्ञतेचं होतं.
ऐन उमेदितले बाळासाहेब ठाकरे आम्ही पाहिले नाहीत (किंबहुना पहाता आले नाहीत, हे आमचं दुर्दैव!). त्यांची झपाटून ऐकणारी भाषणं आम्हाला फार कमी वेळा प्रत्यक्ष ऐकायला मिळाली. पण 'मार्मिक', साहेबांची व्यंगचित्र, त्यांची विरोधकांवर कडाडून टीक करण्याचे शैली, याबद्दल कौतुकाचे बोल आम्ही आमचे आजी-आजोबा आणि आई-वडिलांकडून सतत ऐकत आलोय. तशी आमची पिढी अगदी कॉन्व्हेंटमध्ये नाही तरी इंग्लीश मिडीअम मधून बाहेर पडलेली. तरीही बाळासाहेबांच आकर्षण आम्हाला कायम वाटत आलंय. त्यांची शैली, बिन्धास्त वृत्ती, उत्स्फूर्तपणा यांल कौतूक तर आम्हाला वाटलच पण लाखांची गर्दी खेचणार्या त्यांच्या अनोख्या वक्तृत्वकलेचा अनुभवदेखील त्यांच्या रेकॉर्डेड भाषणांमधून आम्ही घेत राहिलो. त्यांची भाषणं इंग्लीश मिडिअम मधून बाहेर पडणार्या आमच्या पिढीला आपलीशी वाटली कारण ती शब्द आणि व्याकरण यांच्या पल्याडचं काही तरी सांगणारी होती. थेट हृदयाला हात घालणारी होती. शेवटी खरा संवाद हा शब्दांपेक्षाही भावनांच्या अव्यक्त पातळीवर घडत असतो म्हणजे काय, याची जाणीव बाळासाहेबांची भाषणं ऐकताना मिळत गेली.
खरं तर बाळासाहेब ठाकरे आम्हाला पटले वाटले, याचं कारण त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात सापडते. मराठी माणसाचे संवर्धन हा तर त्यांचा प्रमुख मुद्दा होताच पण कधी त्यांची तोफ कधी सततच्या दहशतवादी हल्यानंतरही भारत-पाकिस्तान सामने खेळवणार्या गृहमंत्रालयाच्या बोटचेप्या धोरणांवर रोखली गेली तर कधी ती सिनेसृष्टीच्या बटबटीतपणावर धडाडली. राजकारणाच्या मैदानात लढतानाच संगीत, साहित्य, क्रिकेट याचा देखील मुक्त कंठाने आस्वाद घेणारे बाळासाहेब आम्हाला दिसले. एकिकडे राजकीय रणकंदनात आपल्या विरोधकांचे वाभाडे काढताना आम्ही त्यांना पाहिलं तर दुसरीकडे अगदी शरद पवारांसारख्या पारंपरिक राजकीय विरोधकासोबत वैयक्तिक दोस्ती जोपासतना देखील आम्ही बाळासाहेबांना पाहिलं. इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेच्या उगमानंतर भुजबळ, शरद पवार आणि अलिकडच्या काळात तर राज ठाकरेंच्या पटलेल्या भूमिकांचा पूरस्कार करताना देखील आम्ही त्यांना पाहिलं. अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून राजकारणी म्हणले की मराठी चित्रपटातून निळू फुलेंनी साकारलेले राजकारणीच आमच्या डोळ्यासमोर येत गेले. राजकारणाशिवाय कशातही रस नसणारे असंस्कृत राजाकारणी आम्ही सतत पहात राहिलो. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंच्या बहुआयामी आक्रमक पण सुसंस्कृत नेतृत्वाचं आम्हाला कौतुक वाटत राहिलं.
एक प्रश्न आम्हाला सत विचारलो जातो की 'बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला नेमकं काय दिलं?' खरं सांगायचं तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर देण्याची माझी कुवत आहे, असं मला वाटत नाही. तसे आम्ही राजकारणापासून चार हात लांबच रहाणारे किंबहूना राजाकारण आणि राजकारणी यांचा तिरस्कारच करणारे. तरीही माझ्यापुरतं (आणि कदाचित माझ्यासारख्या बर्याच तरुणांपूरतं) या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये 'हरी तात्यांबद्दल' शेवटी पुं. ल. जे लिहिताता, त्याचाच आधा घेउन बोलायचं झाल, तर दर वेळेस आमच्या मूठी वळतातच, असं नाही. दर वेळेस स्वतःवर होणार्या अन्यायाचा प्रतिकार करता येतोच, असं नाही. आमची मराठी भाषा, संस्कृती यांची गळचेपी होत असताना त्याला प्रत्येक वेळी विरोध करता येतोच, असं नाही. मात्र वेळ आलीच, प्रतिकार करण्यासाठी मुठी वळल्या गेल्याच तर आमच्या मागे बाळासाहेब नावांच दैवत खंबीरपणे उभे राहील, याची खात्री आम्हाला होती. उद्या कुठे दाद मागण्याची वेळ आलीच तर आधाराला बाळसाहेब आहेत, ही आमची श्रध्दा होती. लढा उभारायचा झाल्च तर बाळासाहेबांच्या नेतृत्वावर निस्सिम विश्वास होता. बाळासाहेब आमच्यात नाहीत म्हणजे हे नेतृत्व नाही, हा आधार नाही, हा विश्वास नाही! युगांत म्हणजे काय याचा अनुभव आज मी आणि माझ्यासारखे कित्येक सामान्य मराठी माणसं अनुभवत आहेत!